Hartalika Pictures In Marathi
हरतालिका हा सण,
स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम
आणि त्याग दर्शविणारा आहे.
आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
व भगवान शिव प्रमाणे
एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो
हि आमची सदिच्छा.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा
हरतालिकाचा हा सण..
तुमच्या जीवनात नव चैतन्य आणो,
तुमच्या पती आणि परिवारचे सुकल्याण होवो,
व तुमच्या शरीर आणि आत्म्याला शुद्ध करो
अशी देवी हरतालिके ला प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा
आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात
सुख, शांती, समृद्धी, ख़ुशी
आणि चांगले स्वास्थ्य आणो.
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा
।। श्री हरितालिका देवीची आरती ।।
जय देवी हरितालिके ।
सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओंवाळीतें ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु० ॥
हर-अर्धांगीं वससी ॥
जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथें अपमान पावसी ।
यज्ञकुंडीं गुप्त होसी ॥ जय०
॥ १ ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटीं ।
कन्या होसीं तूं गोमटी ॥
उग्रतपश्चर्या मोठी ।
आचरसी उठाउठीं ॥ जय०
॥ २ ॥
तपपंचाग्निसाधनें ।
धूम्रपानें अधोवसनें ॥
केलीं बहु उपोषणें ।
शंभुभ्रताराकारणें ॥ जय०
॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टीं ।
हें व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हां वरिसी धूर्जटी ।
मज रक्षावें संकटीं ॥ जय०
॥ ४ ॥
काय वर्णूं तव गुण ।
अल्पमति नारायण ॥
मातें दाखवी चरण ।
चुकवावें जन्ममरण ॥ जय०
॥ ५ ॥