Awesome Buddha Purnima Pics In Marathi


Category: Festivals

Buddh Purnima Chya Khup Khup Shubhechha
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा

Buddh Purnima Chya Manahpurvak Shubhechha
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

गौतम बुद्ध यांचे प्रेरणादायी विचार

Quote 1. “आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.”
Quote 2. “आर्थीक विषमता शेतकर्यांच्या दैन्यास कारणीभूत आहे.”
Quote 3. “आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.”
Quote 4. “कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.”
Quote 5. “जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात”
Quote 6. “जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.”
Quote 7. “जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.”
Quote 8. “दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.”
Quote 9. “देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही.”
Quote 10. “पशूंना बळी देणे ही अंध श्रद्धा आहे.”
Quote 11. “पाप अपरिपक्व असे पर्यंत गोड लागते; परंतु ते पक्व होऊ लागले की खूप दु:खकारक असते.”
Quote 12. “पृथ्वी वरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रुपी वृक्षांची छाया अघिक शीतल असते.”
Quote 13. “भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.”
Quote 14. “मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.”
Quote 15. “माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.”
Quote 16. “विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.”
Quote 17. “वैर प्रेमाने जिंकावे.”
Quote 18. “शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, माणसे सगळी सारखीच आहेत.”
Quote 19. “सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.”
Quote 20. “स्रीयांना एक तर्हेचा नियम लागू करणे, व पुरुषांना दुसरा नियन लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.”
Quote 21. “स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.”


बुध्दम शरणम गच्छामि
धम्मम शरणम गच्छामि
संघम शरणम गच्छामि
बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा


क्रोधाला प्रेमाने
पापाला सदाचाराने
लोभाला दानाने आणि असत्याला
सत्याने जिंकता येते
तुम्हा सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

बुद्ध पौर्णिमा ची माहिती

गौतम बुध्दांचा जन्म या दिवशी झाला. याच दिवशी त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि या दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले. जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आरंभीचा प्रथमा वस्थेतील बौध्द धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भीस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुध्द हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधी वृक्षाखाली संबोधी ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दु:ख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौध्दांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यु कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारण परंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारण परंपरेने कसा संबंध पोहोचता, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामुहिक प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

More Entries

  • Happy Diwali Greeting Pic
  • Happy Vat Purnima
  • Kojagiri Purnima Hardik Shubhechha
  • Chaitra Navratri Va Gudi Padwa Chya Hardik Shubhechha

Leave a comment