Awesome Ganesh Chaturthi Images In Marathi
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
गणराया तुझ्या येण्याने सुख,
समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आज गणेश चतुर्थी आजच्या या मंगल दिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित
मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून
सुख समृध्दी ऐश्वर्य येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..
आयुष्य त्याच्या सोंडे इतके
लांब असावे आणी आयुष्यातले
क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत..
गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!
परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया
।| श्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा |।
देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…
वाट पाहतोय आतुरतेने..
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभॆच्छा
||श्री गणपती स्तोत्र||
श्रीगणेशाय नमः ।
नारद उवाच
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यायुष्कामार्थसिद्धये ॥१॥
प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥
लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजं च धूम्रवर्ण तथाष्टमम् ॥३॥
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥४॥
द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिश्च जायते ॥५॥
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥
जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७॥
अष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥
||श्री गणेश स्तोत्र||
जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती ।
करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।।
तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती ।
विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥
तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक ।
सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥
मी तव चरणांचा अंकीत, तव चरणामाजी प्रणिपात ।
देवाधीदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी ॥
माझा लडीवाळ तुज करणे, सर्वांपरी तू मज सांभाळणे ।
संकटामाजी रक्षीणे, सर्व करणे तुज स्वामी ॥
गौरिपुत्रा तू गणपती, परिसावी सेवकांची विनंती ।
मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया ॥
तूच माझा माय बाप, तूच माझा देवराय ।
तूच माझी करिशी सोय, अनाथनाथ गणापती ॥
गजवदना श्री लंबोदरा, सिध्दीविनायका भालचंद्रा
हेरंबा शिवपुत्रा, विश्वेश्वरा अनाथबंधू ॥
भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना ।
परशुहस्ता सिंदुरवर्णा, विघ्ननाशका विश्वमूर्ती ॥
विश्ववदना विघ्नेश्वरा, मंगलाधीशा परशुधरा ।
पापमोचना सर्वेश्वरा, दीनबंधु नमन माझे ॥
नमन माझे विघ्नहर्ता, नमन माझे एकदंता ।
नमन माझे गिरिजासुता, तुज स्वामिया नमन माझे ॥
नाही आशा स्तुतिची, नाही आशा तव भक्तिची ।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची, आशा मनी उपजली ॥
मी केवळ मूढ अज्ञान, ध्यानी तुझे सदा चरण ।
लंबोदरा मज देई दर्शन, कृपा करी जगदीशा ॥
मतीमंद मी बालक, तूची सर्वांचा चालक ।
भक्तजनांचा पालक, गजमुखा तू होसी ॥
मी दरिद्री अभागी स्वामी, चित्त जडावे तुझिया नामी ।
अनन्यशरण तुजला मी, दर्शन देई कृपाळुवा ॥
हे गणपतीस्त्रोत्र जो करी पठण, त्यासी स्वामी देई अपार धन ।
विद्यासिध्दीचे अगाध ज्ञान, सिंदुरवदन देईल पै ॥
त्यासी पिशाच्च भूत प्रेत, न बाधिती कदाकाळात ।
स्वामिची पुजा करोनी यथास्तित, स्तुतिस्त्रोत्र हे जपावे ॥
होईल सिध्दी षण्मास हे जपता, नव्हे कदा असत्य वार्ता ।
गणपतीचरणी माथा, दिवाकरे ठेविला ॥
इति श्री गणपतीस्तोत्रं संपूर्णम्।
श्री गजाननार्पणमस्तु।
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना मराठीPictures.com तर्फे
हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
सर्वाना गणेश चतुर्थी ची हार्दिक शुभेच्छा