Awesome Sad Shayari In Marathi
श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीहीजवळ नसताना तुझि साथ असते मैञी…
मैत्री असावी मनामनाची
मैत्री असावी जन्मोजान्माची,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फक्त
तुझी नि माझी
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील.
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री …फ़क्त मैत्री……
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात.
जाताना एकदा तरी नजर
वळवून जा,
इतरांना नाही निदान मला
कळवून जा,
मन हि अशीच जुळत नसतात,
हि मनाची कळी एकदा
फुलवून जा,
प्रेम केलय काही नाटक नाही,
सगळे हिशेब प्रेमाचे एकदा
जुळवून जा.
जाते म्हणतेस हरकत नाही
कढत अश्रू पाहून जा
नाते तोडतेस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसते आहेस हरकत नाही
बुडती नाव पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणारे गाव पाहून जा