Awesome Vat Purnima Pictures In Marathi
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला
जन्मोजन्मी असाच तुझा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
सण सौभाग्यचा.. बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमा सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
एक फेरा आरोग्यासाठी
एक फेरा प्रेमासाठी
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुझ्या-माझ्या
अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण.
वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रार्थना सौभाग्याची,
पूजा वटपौर्णिमेची!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐💐
सत्यवानाचे वाचवून प्राण,
सावित्री ने हिंदू धर्माची वाढवली शान।
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड,
सावित्रीच्या आठवणीने अंत:करण आजही होते जड।
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वडाला गुंडाळूनी सुताचा धागा,
ह्रदयात आजही आहे सत्यवान जागा।
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
वटसावित्री चे महत्व आणि पुजेची माहिती :
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व :
वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची पूजा करणे. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.
वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व :
वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.
वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत?
फळे ही मधुररसाची, म्हणजेच आपतत्त्वाची दर्शक असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणाऱ्या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोषांपर्यंत झिरपू शकतात.