Best Father’s Day Images In Marathi
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला…
हेप्पी फादर्स डे
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
Happy Fathers Day बाबा!
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
Happy Fathers Day!
पूर्वी वडिलांच्या अंगावरील जुने कपडे पाहून,
मी त्यांना कित्येकदा “ओरडलो” असेल कि,
नवीन कपडे शिवून घ्या,
फाटेपर्यंत घालायचे असतात का ?
पण ते “हो” म्हणून वेळ मारून नेत असतं…
तसा दिवाळीचा आणि आपला काही संबंध नाही
पण, “स्त्रीहट्ट” आणि “बालहट्ट” सांभाळून घेताना,
कोणाला कपडे, कोणाला मोबाईल…
वगैरे वगैरे अशी खूप मोठी प्लांनिग केली,
अचानक लक्षात आले “स्वत:साठी” काहीच ठरवले नाही….
तोच समोर “वडिलांचा चेहरा” समोर आला,
वडील तेव्हा का जुने कपडे घालत असतं,
ते कळून चुकले, मात्र…
मी स्वत “वडील” झाल्यावर….
कपड्याने दरिद्री दिसणारे वडील…
पैश्याने मोजता येणार नाही असे
“धनवान” असतात…
कुटुंबाच्या सुखातच स्वतचे सुख शोधतात…
आदर असतोच, पण….
आणखीच वाढला… अन…
न कळत डोळ्याची किनार पाणावली….
बापाची चप्पल आपल्या पायात आली कि,
आपण कधी वडिलांना लक्षात घेतंच नाही…
कित्येकदा उद्धटासारखेहि वागतो…
पण आपण “लक्षात न घेतलेला बाप”…
लक्षात येतो…
मात्र आपण स्वत बाप झाल्यावरच…
🦋 💐हॅप्पी फादर्स डे 🦋
‘बाप कुंभाराचे हात, लेक चिखलाचा गोळा
एक कौतुकाची थाप,देई आव्हान आभाळा!’
खरोखरच आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात बाबांचं अस्तित्त्व लाख मोलाचं असतं, नाही का ?
Happy Father’s Day
आपले चिमुकले हाथ धरून जे आपल्याला चालायला शिकवतात… ….
ते बाबा असतात.🌹
आपण काही चांगले केल्यावर . जे अभिमानाने सगळ्याना सांगतात… .
ते बाबा असतात.🌹
माझ्या लेकराला काही कमी पडू नए या साठी जे घाम गाळतात…. …..
ते बाबा असतात.🌹
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात..
ते बाबा असतात.🌹
आपल्या लेकराच्या सुखा साठी जे आपला देह ही अर्पण करतात….. ….
ते बाबा असतात.🌹
Happy Father’s Day 🌹🙂
नशीबवान आहेत ते
ज्यांचे वडील त्यांच्या सोबत आहेत
आम्ही पण खूप नशीबवान आहोत
कारण
आमचे वडील आम्हालाच नाही
तर
त्या देवाला पण खूप आवडायचे
त्यामुळे
त्यानआमच्या वडिलांना
त्याच्यापाशी बोलावून घेतले.
I Miss U 😭Father😭
Happy father day to everyone