Best Gudi Padwa Images In Marathi


Category: Festivals

Gudi Padwa Wonderful Message Image

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष तुमच्या प्रत्येक पावलावर शांती, समृद्धी आणि अंतहीन आनंद घेऊन येवो.

Gudi Padwa Best Wishing Pic

तुम्हाला उज्ज्वल आणि समृद्ध गुढी पाडव्याच्या शुभेच्छा! तुमचे जीवन आनंद, यश आणि प्रेमाने भरलेले जावो.


“निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी
नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


“माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना
व त्यांच्या परिवाराला
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.”


“पालवी चॆत्राची अथांग स्नेहाची,
जपणुक परंपरेची,
ऊंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची,
सम्पन्न्तेची, उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !”
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुडी उभारू,
आला चैत्र पाडवा…
हैप्पी गुड़ी पड़वा

Gudi Padwachya Hardik Shubhechha
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा सणाची माहिती

मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र महिना आहे. चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. ह्या दिवशी दारोदारी गुढी उभारतात आणि नवीन सुरू होणाऱ्या वर्षांचे स्वागत करतात. ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीतली जुनी परंपरा आहे. परंपरा जुनी म्हणजे ब्रह्मदेवानं जेव्हा ही सकल सृष्टी निर्माण केली. त्या वस्तू मात्रांचा कार्यारंभाचा हा दिवस म्हणून गुढी लावतात.

प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येला परत आले. त्या दिवशी सकल अयोध्या वासियांनी गुढ्या तोरणं उभारून श्रीरामांचे स्वागत केले होते.

ह्या चैत्र महिन्यांत जर आपण सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केले तर असे लक्षात येत की, शुष्क झालेली सृष्टी, पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ, निष्पर्ण झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव पालवीने फुललेले असतात. वसंत ऋतूची चाहूल ही कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सु-स्वराने लागलेली असते. निसर्गातल्या परिवर्तनाचा, नवे चैतन्याचे, नवे सृष्टीचे स्वागत दारी गुढी लावून करायचे हा पण त्या मागचा एक उद्देश आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून मंगलस्नान करावे, आणि सुर्योदयाच्या वेळी म्हणजेच ब्राह्म मुहुर्तावर ही गुढी उभारायची असते. एक उंच काठी घेऊन त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र. कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांची माळ, साखरेची गाठी ह्या वस्तू बांधायच्या. त्यावर कास्याचा गडू लावायचा. ही तयार केलेले गुढी दारांत लावायची.

ज्या ठिकाणी गुढी उभारणार ती जागा स्वच्छ करून धुवून-पुसून त्यावर रांगोळी काढावी.
गुढीची काठी तिथे नीट बांधावी.
काठीला गंध, फुलं, अक्षता लावाव्यात. गुढीची पूजा करावी. निरांजन लावावे.
उदबत्ती दाखवावी. दुध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवावा.
दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात.
संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हां हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.

गुढी पाडव्याचे दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजन करून त्यातील नव संवत्सर फल वाचले जाते. चैत्र प्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. म्हणून या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ इ. गोष्टी केल्या जातात.

त्या दिवशी आई, आजी-आजोबा हे कडुलिंबाची पाने खायला सांगतात. त्या मागचे शास्त्रीय कारण असे आहे की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचे, पवित्र्याचे, समृद्धीचे प्रतिक आहे.

ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नव वर्षाचे अभिष्टचिंतन ही केले जाते.
ह्या गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो. ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

More Entries

  • Diwali Padwa Status Photo
  • Mokshada Ekadashi Photos
  • Gita Jayanti Message Image
  • Happy Holi Marathi Lovely Wish Pic
  • Navratri Best Message Image
  • Durga Puja Greeting Picture
  • Best Shivaji Jayanti Message Image

Leave a comment