Best Marathi Quotes For You
चिंटी चावल ले चली…
चिंटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहै कबीर दो ना मिलै,
इक ले डाल॥
अर्थात :
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला दाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.’
पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
तांदुळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, दाळीने हिरावून घेतला.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना!
एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो.
तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं.’
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात.
हे मर्म लक्षात घेऊन शोषणशासनव्यवस्था विकल्पांची लयलूट करतात. ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’ अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषणशासनव्यवस्थांना हाकायला खुप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तुही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तुंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे.
परिणामी लोक चांगल्या वस्तुही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तुंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे. पायापाशी असणारं सुख मृगजळासारखं पुढच्या चौकात, तर तिथे गेल्यावर ते, आणखी पुढच्या चौकात दिसू लागलं आहे.
बायबलमध्येही म्हटलं आहे, ‘परमेश्वर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उपहार (गिफ्ट्स) ठेवत असतो. त्यापैकी कोणत्या तरी एका बाजूच्याच गिफ्ट्स तुम्हाला घेता येऊ शकतात.’
तर भगवान बुद्धांनीही हेच सांगितले आहे की, ‘विणेच्या तारा झंकृत व्हाव्या म्हणून, इतक्या ताणू नका, की छेडताच तुटतील आणि तूटण्याच्या भीतीने इतक्या सैलही सोडू नका, की छेडल्यावर त्या झंकृतच होणार नाहीत.’ यालाच बुद्धांचा ‘प्रतीत्य (कारण) समुत्पाद’ (कार्य) किंवा ‘मध्यमा प्रतिपद’ म्हणतात.
मुळात माणूस हा उजवाही नसतो अनं डावाही नसतो. त़ो ‘प्रतीत्य समुत्पादी’ म्हणजे मध्यममार्गीच असतो. पण तो तसा असणं हे शोषणशासनसंस्थांच्या हिताचं नसतं. म्हणून त्या त्याला तसं राहू देत नाहीत. त्याच्यासमोर चांगल्या-वाईट विकल्पांचा पसारा माडून, ते त्याला उजव्या-डाव्या छावण्यांमध्ये विभाजित करतात. त्यावर काही चतुर माणसं ‘सेंटर टू लेफ्ट’ वा ‘सेंटर टू राईट’ अशी पळवाट काढतात. पण सगळे काही चतुर नसतात. त्यांना कुठल्या न कुठल्या पारड्यात आपलं वजन टाकावच लागतं.
या अगतिकतेला, आपली दोन्ही हातांनी गोळा करायची आसक्तीच कारणीभूत आहे.
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकावू बनतो. कबीरांच्या या दोह्यात असा मोठ्ठा आशय दडला आहे.
– श्री वसंत चरमळ
नागराज मंजुळे यांचा सूंदर लेख:
☕ माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
मला विचारलच नाही;
मला Good morning केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही;
माझं नावंच घेतलं नाही;
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;
माझा फोन घेतला नाहीं ;
मला बसायला खुर्चीच दिली नाही;
मला मानच दिला नाही.
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं.
✍ तो लगेच सोडता येणार नाही. पण कठिणही नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे.
🙏🏻💐
इतिहासातील एक मनोरंजक घटना
स्कॉटलंड मध्ये एक अतिशय तुटपुंजी आर्थिक परिस्थिती असलेला एक शेतकरी होता. एके दिवशी नेहमी प्रमाणे त्याच्या शेतीच्या कामात व्यस्त होता तेंव्हा त्याला, एका लहान मुलाच्या किंकाळ ऐकू आल्या. जीवाच्या आकांताने ओरडत असलेल्या त्या हाका ऐकुन त्या शेतकऱ्याने हातातली अवजारे/शेतीच काम सोडून आवाजाच्या दिशेने धाव घेतली. सदर जागी जाऊन पाहतो तर एक चिमुरडा, दलदल मध्ये गळ्यापर्यंत रुतलेला दिसला. काही क्षणांचा विलंब आणि त्या मुलास जिवंत समाधी, अशी स्थिती पाहून त्या शेतकऱ्याने स्वतः चा जीव धोक्यात घालून, प्रचंड अरापिता करीत त्याच्या आजूबाजूचा गाळ काढला, आणि त्या जीवघेण्या संकटातून त्या मुलाची सुटका केली.
दुसऱ्या दिवशी लवजम्या सहित एक आलिशान बग्गी त्या शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबली. त्या बग्गी मधून एक अतिशय धनवान व्यक्ती उतरली आणि त्या शेतकऱ्या च्या घरी गेली. त्या व्यक्तीने शेतकर्यास स्वतःचा परिचय दिला, की काल ज्या मुलाला तुम्ही मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, त्या मुलाचा ती व्यक्ती पिता आहे, म्हणून शेतकऱ्याने केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद देणे करिता ते आले आहेत. त्यांचा वार्तालाप चालू होता, त्या धनाढ्य व्यक्तीला त्या दरम्यान जाणवलं की हा शेतकरी आर्थकदृष्टया तितका सक्षम नाही, तथापि अतिशय स्वाभिमानी आहे, हा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेणार नाही.
त्या शेतकऱ्याचा मुलगा, दरवाज्यातून आत येतो. त्या धनाढ्य व्यक्तीने त्या मुलाबद्दल शेतकऱ्याला चौकशी केली की हा कोणत्या शिकत आहे. शेतकऱ्याने त्यास उत्तर दिले की त्याचा मुलगा हा काही विद्यार्जन करत नसून, शेती कामात मदत करतो. यावर त्या धनाढ्य व्यक्तीने शेतकऱ्यास असे सुचविले की, की माझ्या मुलाला तुम्ही जीवनदान दिलं त्या बदल्यात तुमच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी मला घेऊ द्या, जेणेकरून मी तुमच्या मुलास उत्तम भविष्य, देऊ शकेन. यावर त्या शेतकऱ्यानं सहमती दर्शविली.
त्या शेतकऱ्याच्या मुलाला इंग्लंड च्या नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश दिला गेला आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू झालं. काही दिवसातच कळाल की हा मुलगा सर्वसामान्य नसून विलक्षण बुद्धिमान आहे, त्या मुलाने शिक्षण क्षेत्रात अतिशय कौशल्य दाखविले, आणि तो उच्चशिक्षण देखील घेऊ लागला. पुढे तो मुलगा संशोधन कार्यात उतरला.
ही दोन्ही मुलं त्यांच्या ऐन तारुण्यात असताना, त्या धनाढ्य व्यक्तीचा मुलगा आजारी पडला. आजार वाढतच चालला होता, आर्थिकदृष्ट्या अतिशय बलवान असल्याने त्याच्या पित्याने उपलब्ध असणाऱ्या सर्व वैद्य, औषधोपचार केले, पण तरीही आजार उतरत नव्हता. त्या वेळेला त्या आजारास कोणतेही ठोस आणि खात्रीलायक औषध नव्हते. याच दरम्यान त्या शेतकऱ्याच्या मुलाने, त्याच्या संशोधन कार्यात एक जबरदस्त मजल मारली, आणि एक लस शोधून काढली, आणि नेमकी हीच लस म्हणजे त्या धनिकाच्या मुलाच्या आजारावर रामबाण औषध होती. त्या लसिमुळएच पुन्हा एकदा हा मुलगा मृत्यूच्या तोंडातून परत आला.
बालपणी ज्याने जीवदान दिले, त्याच्याच मुलाने तारुण्यात पुन्हा एकप्रकारे त्याच धानिकाच्या मुलाचा जीव वाचविला होता. हा कुठेतरी प्रामाणिक पणाने, कृतज्ञ पणाने स्वतः च्या मुलाला वाचविले ची परतफेड करणे करिता केलेल्या कार्याची ही एक प्रकारे परतफेड होती.
आता ही सर्व पात्रे कोण ते सांगतो,
तो धनिक व्यक्तीचा मुलगा, म्हणजे इंग्लंडचा माजी पंतप्रधान, विन्स्टन चर्चिल,
तो शेतकऱ्याचा मुलगा म्हणजे, थोर शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्याने शोधून काढलेली लस म्हणजे, पेनिसिलीन.
म्हणून इतरांना मदत करा,नेहमी परतफेड मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी.आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातून च नवीन काहीतरी निर्माण होत असते..
बासरीवाला मुलगा
अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर झाले होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदीरच उंदीर होते. त्यामुळे अन्न – धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी ठरवतात. पण, अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळे गावकरी खूप त्रस्त होतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवाल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ‘मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.’ गावकरी तयार होतात.
मग, तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदीरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात. बासरीवाला मुलगा गावकऱ्यांकडे आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला शंभर सुवर्णमुद्रा दयायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की, ‘आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.’ तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो. पण यावेळी बासरीच्या आवाजाने गावातील लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदराप्रमाणे आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळे गावकरी त्याला थांबवतात व ठरल्याप्रमाणे शंभर सुवर्णमुद्रा देतात.
तात्पर्य – “जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये. ”
आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली
● स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली
● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला
● झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला
● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली
● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं
★ पारधी येणार हेच विसरून गेलं
★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणी निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला
•कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.
【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.
मित्रांनो कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते……
प्रत्येकाचे दिवस येतात
काल एका मेडीकल स्टोअरवर औषधी घेण्यासाठी मी उभा होतो.
एवढ्यात अंगावर सामान्य कपडे घातलेला, दाढीचे खुंट वाढलेला एक खेडूत वृद्ध
औषधांची चिठ्ठी घेवून तेथे आला.
दुकानदाराने प्रिस्क्रिपशन पाहून एक औषधी पावडरचा मोठा डबा काऊंटरवर ठेवला.
“350 रू…..” तो म्हणाला.
वृद्ध व्यक्तीने सद-याच्या खिशातुन पैसे काढले.
ते जेमतेम 310 भरले.
” एव्हढेच आहेत….
बाकीचे नंतर देतो….
आम्ही
दवाखान्यातच आहोत !”…तो म्हणाला.
दुकानदाराने त्याच्याकडे कुत्सित नजरेने पहात
दणक्यात डबा उचलून कपाटात ठेवला.
बाबा अस्वस्थ झाला.
..काय करावे त्याला
समजेनां…
त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
जवळच उभ्या असलेल्या एक सदगृस्थाने तात्काळ
सांगितले….
” उरलेले पैसे माझ्या बिलातून घ्या….द्या त्यांना तो डबा !”
दुकानदाराने डबा पुढ्यात ठेवला, पैसे घेतले.
“दादा, बाळाला कसं द्यायचं हे पावडर….
तो तर अजून दोन दिवसांचाच आहे ? वृद्धाने चौकशी केली.
“बाबा, हे बाळासाठी नाही…..त्याच्या आईसाठी
आहे.”
“असं होय,
मग वाईच राहू द्या…
मी नंतर घेतो.”
म्हणत म्हतार्याने डबा परत केला.
दुकानदार पुन्हा चिडला.
..पैसे परत करत त्याने रागाने
म्हातार्याकडे पाहिले व डबा परत ठेवला.
वृद्धाने जास्तीचे पैसे त्या गृहस्थाला परत केले व
चालू लागला.
मी त्यांच्यासोबत चालत त्यांना विचारलं….
“कां परत केला बाबा डबा…?”
चेहर्यावरचा घाम पुसत ते म्हणाले…
“अहो, मला वाटलं तो लेकरासाठी आहे…..
म्हणून घेत होतो…
त्याच्या आईला काय ?….
ती आता बरी आहे…
उद्या बाळाला काही औषध लागलं म्हणजे कुणाकडे हात पसरायचे ?”
मी आवाक झालो……
माझ्या मनात प्रश्न फेरधरुन
नाचू लागले.
परीस्थीने माणूस किती हिशोबी होतो ?
त्याचे प्राधान्यक्रम कसे बदलतात ?
प्रेमाचा प्रवाह कसा झटक्यात दिशा बदलतो ?
लेकीवरचं
त्याचं प्रेम कमी होतं कां ?
गरीबीपुढे माया, ममता
कशी आगतीक होते ?
…….या व अश्या असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्याला झिणझिण्या आल्या.
हजारो, लाखोंची
उलाढाल करणार्यांसमोर सामान्य माणसांच्या गरजा
किती माफक असतात.
त्या बाबांची अडचण किती
गंभीर होती व नड किती शुल्लक होती.
त्यांनी त्यावर संयमाने किती सहज मार्ग काढला.
परीस्थीतीचा बाऊ नाही, दुकानदारावर राग नाही,
व्यवस्थेविरुद्ध त्रागा नाही.
आहे ती परीस्थिती
स्विकारुन बाबांनी आपले प्राधान्यक्रम ठरवले होते.
माय महत्वाचीच,
पण त्या स्थितीत त्यांना लेकराची अधिक काळजी होती.
तो डबा लेकरासाठी असता तर
कदाचित त्यांनी तो घेतलाही असता.
प्रसंगी दुसर्याकडून मदत मागितली असती.
याचनाही केली असती.
मात्र, आईला तूर्त गरज नाही हे त्यांनी
काढलेलं निदान.
कदाचित ते आगतिकतेतून आले
असेल.
माय, ममता आणि आगतिकता यांचा विचार करतच
मी एका वेगळ्याच तंद्रीत चालत होतो.
“ओ साब, रास्ता छोडो…..बीच रास्तेमे क्यो चल
रहे हो ?”
रिक्क्षावाल्याच्या उद्दाम सूचनेने मी भानावर आलो.
रस्त्याच्या डाव्या बाजूला होत माझी नजर त्या
म्हातार्या बाबांचा शोध घेवू लागली.
ते मात्र, हाॅस्पिटलच्या गर्दीत सहज मिसळून गेले.
काहीच घडलं नाही या अविर्भावात
मी स्वतःशीच म्हणालो….
“ह्याला जीवन ऐसे नाव !
……. अज्ञात व्यक्ती…
मित्रांनो प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळं इतरांना मदत करत चला ….
देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही.
“तू नाष्ट्याला काय खाणार आहेस आज … ?”
नेहमीच्या ठसक्यात तिने रोजचा सवाल केला ..
“काहीही कर …”
दात घासता घासता त्याने अर्धवट बोबड्या आवाजात उत्तर दिलं .. नेहमीसारखंच ..
“पोहे … ?”
त्याने नाक मुरडलं …
“उपमा .. ?”
त्याने उगाचच खाकरत विरोध नोंदवला …
“थालीपीठ .. ?”
“ए .. बरं काहीतरी कर ना …”असं म्हणत त्याने टॉवेलला तोंड पुसलं ..
चेहऱ्यावरचा टॉवेल बाजूला झाला तेव्हा ती त्याच्यासमोर उभी होती ..
रखुमाई बनून .. !अर्थात कमरेवर हात ..
“तुला काहीच कसं चालत नाही रे .. ? रोज रोज फाईव्ह स्टार पदार्थ आणायचे कुठून …”
तो काहीसा डिफेन्सिव्ह …
“तसं नाही .. काहीतरी वेगळं हवं इतकंच …”
आणि तिचा आवाज अजूनच चढला …
“वेगळं म्हणजे काय .. ? मला नाही कळत … तू सांग .. मी खायला करून घालते ..”
मग बराच वेळ त्याला ही काही सुचलं नाही ..
पण तो कुरबुरत राहिला .. सकाळचं खाणं बेश्ट पाहिजे ..
अख्ख्या दिवसाचा मूड ठरतो त्यावर …
आणि तिकडे तिचा पारा चढलेला …
पट्टा सुरु … सकाळची धावपळीची वेळ …
पिंकू ची शाळा … बाईची गडबड .. केरवारे … लादी .. भांडी ..
आणि त्यात ह्याचे खाण्यापिण्याचे चोचले …
पटकन खायचं .. मोकळं व्हायचं .. ते नाही ..
अंत पाहतो अगदी …
आणि बोलता बोलता तिने फ्रीझ उघडला ..
पिवळ्या प्रकाशातून बाहेर डोकावत ती तिथूनच ओरडली ..
“मटकी आहे … मिसळ करू … ?”
तो एव्हाना किचनच्या दारात आलेला …
डोळ्यात चमक …
“चालेल … पण तिखट कर हां…”
तिने फणकाऱ्याने मटकीचं भांडं बाहेर काढलं …
“हो, मीच शिरते आता त्याच्या आत …म्हणजे होईल झणझणीत!”
तसा तो उत्स्फूर्तपणे म्हणाला … “अगं .. गोड होईल मग ती ..!”
आता तिचा हात थांबला .. तिने त्याच्याकडे पाहिलं ..
मटकी गॅसवर चढेपर्यंत राग पूर्ण ओसरलेला ,..
आणि गालावर एव्हाना लाजेची खळी फुटलेली …
तात्पर्य काय …
संसारात योग्य वेळी योग्य शब्दांची फुंकर घालता यायला हवी …
म्हणजे मग भांडण फार वेळ धगधगत रहात नाही ..
(नवरा बायको दोघांनाही लागू ..)
नाती काय असतात..
*।।आई- वडील।।*
सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातं
पंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं, आपल्या घराची जीवित दैवत, तीर्थाचे सागर , स्नेहाचे आगर
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती, आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर प्रेमसिंचन करणारे स्नेह – निर्झर.
*।।काका – काकी।।*
आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर – सरिता
विशुध्द भावाचे चिंतामणी.
*।।आजी – आजोबा।।*
आपले जीवन फुलविणारे माळी
आपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश, स्वतःचे रुप आपल्यात पाहणाऱ्या वात्सल्यमूर्ती.
*।।बहिण।।*
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका, कुठल्याही परिस्थितीत आपल्या हिताचा विचार करणारी हितचिंतिका.
*।।भाऊ।।*
आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.
*।।गुरुजन।।*
आपल्या भविष्याचे शिल्पकार
आपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत.
*।।सासू – सासरे।।*
आपल्याला जन्म न देणारे आईवडील
पदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.
*।।आत्या – मामा।।*
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.
*।।मामा।।*
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.
*।।मामी।।*
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.
*।।दाजी।।*
आपल्या आदर भावाचं शिखर
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.
*।।साडु।।*
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ.
*।।मेहुणी।।*
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.
*।।मावस भाऊ – बहीण।।*
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.
*।।मेव्हणा भाऊ – बहीण।।*
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.
*।।भाचे – भाची।।*
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.
*।।पुत्र।।*
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी.
*।।मुलगी।।*
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.
*।।नातवंडे।।*
दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.
*।।मित्र मैत्री।।*
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला, स्वतःचेच प्रतिरुप.
*।।शेजार धर्म।।*
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.
*।।शिष्य।।*
आपल्या कर्तृत्वाचा कळस व
आपल्या कौशल्याची किरणं.
खरंच माणुस नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा माणुस .
नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?
नाते जपा…..नाते टिकवा……..! माणुस म्हणुन जगा……
” हे जीवन पुन्हा नाही “……….!
देवावर विश्वास नाही
ज्याचा देवावर विश्वास नाही त्याने जरुर वाचा
भारतातील प्रख्यात हार्ट स्पेशालिस्ट डाॅ. मांडके त्या दिवशी खूप आनंदात होते.
त्याला कारणही तसेच होते. नुकताच त्यांना त्यांच्या शोधनिबंधासाठी एक प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला होता.
त्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते विमानाने दिल्लीला जायला निघाले होते.
ठरल्या वेळी विमानाने उड्डाण केले.
डाॅ. मांडके विचारात गढून गेले होते. त्या शोधनिबंधासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले होते. रात्रंदिवस ते संशोधनात मग्न असत. अनेक विचारांची दाटी झाली होती त्यांच्या मनात….
इतक्यात ….
अचानक …विमानाचे आपातकालीन लँडींग करण्यात आले.
डाॅ. मांडके समारंभाला वेळेवर पोहोचण्याच्या काळजीत पडले…
विमानतळावरील अधिकारी त्यांना म्हणाले की पुढची फ्लाईट 10 तासांनी आहे.
त्यामुळे डाॅक्टरांनी एक कार भाड्याने घेऊन पुढे जायचे ठरवले.
जवळपास 5 ते 6 तासांचा तो प्रवास होता.
त्यांना गाडीने जायचा कंटाळा आला होता कारण ते दमलेले होते आणि त्यांना थोडा आराम हवा होता.
पण काहीच पर्याय नसल्याने ते गाडी चालवत निघाले….
प्रवास सुरु होऊन एखादा तास झाला होता ..इतक्यात ..वातावरण अचानक बदलले आणि खूप जोराचा पाऊस सुरु झाला..
रस्त्यावरचे बोर्ड नीट दिसत नव्हते.
बरेच अंतर पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते रस्ता चुकले आहेत…
पावसाचा जोर वाढतच चालला होता. नाईलाजाने आसरा शोधून थांबावेच लागणार होते.
सुदैवाने थोड्याच अंतरावर त्यांना एक लहानसे कौलारु घर दिसले.
कसेबसे ते तिथे पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला.
एका तरुण स्त्रीने दार उघडले आणि अगत्याने त्यांना आत येण्यास सांगितले.
तिचे घर अगदीच साधे होते. घरात सामानही अगदी थोडेच होते. कोणत्याच महागड्या वस्तू नव्हत्या.
त्या स्त्रीने डाॅक्टरांसाठी चहा आणि काही बिस्किट आणले.
जरा वेळाने ती म्हणाली ..
माझी प्रार्थनेची वेळ झाली आहे. आपण माझ्यासोबत प्रार्थना करणार का?
डाॅक्टरांचा फक्त कर्मयोगावर विश्वास असल्याने त्यांनी नम्रपणे नकार दिला!
ती स्त्री उठली आणि एका छोट्या कोनाड्यात असलेल्या मुर्तिसमोर दिवा लावून प्रार्थना करायला लागली.
प्रत्येक कडव्यानंतर ती तिथे ठेवलेला एक छोटासा पाळणा हलवत होती.
डाॅक्टर तिचे निरिक्षण करत होते आणि त्यांच्या मनात तिला विचारण्यासाठी अनेक प्रश्न तयार होते!
काही वेळाने तिची प्रार्थना संपली.
डाॅ. नी तिला विचारले …
या सगळ्यांचा तुम्हाला काही उपयोग झाला का कधी?
देवाने कधी तुमची हाक ऎकली आहे का?
आणि तुम्ही तो छोटासा पाळणा का हलवत होतात?
त्या स्त्रीच्या चेहे-यावर अचानक खिन्नता आली…
खोल आवाजात ती म्हणाली …
“माझ्या 2 वर्षांच्या मुलाला जन्मत: ह्रुदयरोग आहे…
मुंबईतील प्रख्यात डाॅ. मांडके सोडून त्याचा इलाज कोणीही करू शकणार नाही. पण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नाहीत..
मी रोज देवाला प्रार्थना करते की कसेही करुन मला त्यांच्यापर्यंत ने आणि माझ्या मुलाला जीवदान दे. मला खात्री आहे.. एक दिवस देव मला नक्की मदत करेल…”
पुढचे बरेच क्षण तिथे सुन्न शांतता पसरली …
डाॅ. मांडके अगदी स्तब्ध झाले …
काय बोलावे ते कळेनाच त्यांना …
त्यांनी मागच्या काही तासांमध्ये घडलेल्या घटनाचक्राचा विचार केला …
कोणतेच लक्षण नसताना हवामान खराब होऊन विमान ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही….
गाडीने जाताना पावसाने रस्ता चुकला …
याच घरात आसरा घ्यावा लागला …
आणि …आता त्या स्त्रीने सांगितलेली वस्तुस्थिती
काय अद्भूत् ..चमत्कारच जसा ..
काही क्षणातच डाॅ. भानावर आले. त्यांनी तिला त्यांची ओळख सांगितली आणि वातावरण ठीक झाल्यावर तिला आणि तिच्या बाळाला घेऊन ते मुंबईला निघाले …!
सोबत आणखी एक गोष्टपण घेतली त्यांनी ….
देवावरची अपार निष्ठा !
कोणत्याही पुरस्कारापेक्षा खूप काही जास्त मिळाले होते त्यांना..!!
या जगात कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे, ती कोणत्या रूपात आहे सांगता येत नाही, प्रत्येक धर्मात वेग वेगळी तत्व सांगितली आहेत,पण देव आहे एवढे मात्र नक्की🙏
विश्वास नागरे पाटील यांचा सूंदर लेख
माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
मला विचारलच नाही;
मला Good morning केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही;
माझं नावंच घेतलं नाही;
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;
माझा फोन घेतला नाहीं ;
मला बसायला खुर्चीच दिली नाही;
मला मानच दिला नाही.
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं.
तो लगेच सोडता येणार नाही. पण कठिणही नाही.
प्रयत्न करायला काय हरकत आहे.
लक्षात ठेवा एकदा का जर नात्यात क्लिष्टता निर्माण झाली की
ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तिच्या मनातून कायमचे उतरता.
“पेरणी चालू आहे..”
काय पेरायच हे आपल आपणच ठरवायच
सुंदर संदेश नक्की वाचा
“आपण एक दाणा पेरला असता,
आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ?
धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं .
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे.
आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो, हजारो दाणे देतो.
अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख, राग, द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो, हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच परत मिळेल..,
आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असाल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून परत मिळणार यात काहीच शंका नाही!
सकारात्मक विचारांचे सामर्थ्य
मनासारखा नवरा नाही मिळाला. करायचा म्हणून संसार करते, जगण्यात काही मजाच नाही सर, खूप नैराश्य येते, रोजचीच भांडणं, हेवे-दावे-तूतू मैं-मैं जीवन नकोसे वाटतंय, झोप येत नाही, जेवण जात नाही अस उदास व रडक्या आवाजत रडगाणं गाणार्या महिलेला पाहून वाटलं. त्या स्त्रीला कसा का होईना – नवरा बरोबर आहे. ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे? त्याच वेळी एक गाणं आठवलं.
‘‘चाँद मिलता नही – सबाके संसार मे ।है दिया ही बहोत रोशनी के लिए.’’
खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे. मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी – भय – यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते. रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना – सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच – मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
थॉमस् अल्वा एडिसनने 999 प्रयोग केले – हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. – थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला – 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही.
नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार – सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे – तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे – मी तुझी आहे, मी तुझी आहे….
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे.
जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून – अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते – चुका होतात – हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं – तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
‘‘ कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत
अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत.’’
ज्ञानवर्धक बोधकथा
“एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.”
तात्पर्यः
“कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही.”
*धन म्हणजे काय…? – एक सुंदर विचार*
——————————————————
*वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे – “धन”*
*वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो “माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे” तो क्षण म्हणजे पत्नीचे – “धन”*
*आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती इच्छा पुर्ण करतो,तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे – “धन”*
*ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या च्या आयुष्यात होतो ते खरे “धनवान”*