Best Vat Purnima Messages In Marathi
वटपौर्णिमा !!!
काय आहे ७ जन्माचे रहस्य?
७ जन्म हाच पती मिळवा
यावरून खूप विनोद होत आहेत. पण हे सगळेच अज्ञान मूलक आहेत.
मुळात या ७ जन्म मागणीत पुढच्या जन्माचा संबंधच नाही. तो होणार का नाही? माहित नाही. माणसाचा मिळेल का? माहित नाही. हीच पुन्हा ओळखायची कशी? अशा निरर्थक बाबी आपल्या शास्त्रात नाहीत.
मग काय आहे ७ जन्म?
ही शुद्ध जीवशास्त्रीय भूमिका आहे.
शरीरविज्ञान सांगते की आपल्या शरीराची रचना राज्यसभेसारखी असते.
काही पेशी मरतात काही नवीन जन्माला येतात. शरीर सतत बदलत असते आणि तरीही अखंड वाटते.
या शरीरातील एकूण एक पेशी बदलायला काळ लागतो १२ वर्षे.
म्हणून तप करायचे १२ वर्षे.
१२ वर्षांनी आपले शरीर पूर्ण बदलत असते. जणू एक नवा जन्म.
असे सात जन्म म्हणजे १२×७=८४.
पूर्वी लग्न होत १६ व्या वर्षी.
त्यावेळी ती नवविवाहिता प्रार्थना करायची की सात जन्म हाच पती भेटो अर्थात पती १६+८४=१०० वर्षे जगो !!!
पतीच्या शतायुत्वाची कामना आहे सात जन्म.
पुढच्या जन्माचा काहीही संबंध नाही. 🙏 वटपौर्णिमा
स्वतःची नाश्त्याची प्लेट लावताना,..
तो म्हणाला
तुला उपवास असेल ना
वटपौर्णिमेचा,..?
ती हसत म्हणाली,..
तू केलास तरी चालेल,..
छे बायकांचा सण आहे,
आमचं काय त्यात??
अरे पण ध्येय तर तुम्हीच ना,.
तो म्हणाला,..
पण तुला पटतं,..
हे सात जन्म बुकिंग
आणि त्या दोऱ्याने
कन्फर्मेशन होतं असं वाटतं?
माहीत नाही रे
पण एक पॉझिटिव्ह एनर्जी
भावनेला अध्यात्माची किनार,..
नकळत 7 जन्माचा
एक पॉझिटिव्ह व्ह्यू,..
आणि थोडक्यात
सगुण निर्गुण भक्तीसारखं
वाटत मला हे व्रत….
वड, दोरा, आंबे
हळदी, कुंकू,..
वस्त्रमाळ,..
आणि नटलेली ती किंवा
हे सगळं नसतानाही ,..
धावपळीत ऑफिसला जाताना
त्याला मिठी मारून
*Take care* म्हणून
जाणारी ती
शेवटी भाव तर एकच
ध्येय तर नवरेच,..
फक्त धागे मनाचे रहावेत
गुंतलेले,..
मग ते तिने मारलेलेच
असावे हा अट्टहास नको
दोघांच्या मनाचे धागे
जुळलेले असले तर
सात जन्माचं
कुणी पाहिलंय…
पण हा जन्म तर
नक्कीच सुखात जाईल…
#🙏 वटपौर्णिमा