Good Morning Poems In Marathi
“पहाटे पहाटे सकाळची प्रसन्न वेळ
वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन
दुरुन येणारा घंटीचा घंटानाद्
आरतीचा आवाज
गोट्यातील गायीचे
वासरासाठी हंबरणे
… पक्षांचा चिवचिवाट
सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची सुंदर सुरवात
मंगलमय होऊ दे……
शुभ प्रभात.
“एक दिवस आली ती सुंदर
पहाट सगळी कडे चमचमाट,
विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाट, आशा चिञ विचिञ
वातावरणात भवानी मातेच्या
मंदिरात शिवनेरी गडात ।
जन्मली एक वात जि करणार
होती मुघलांचा नायनाट,
मराठ्यांचा सरदार हिँदवी
स्वराज्याचा आधार शहाजीचा
वारसदार छत्रपती शिवाजी
महाराज
जय महाराष्ट्र
!|!॥- शुभ प्रभात -॥!|!”
हिरव्या पाचु परी सोनेरी रूपेरी
मऊ मोरांचे मोरपंख,
ढगांच्या गडगडाटासह
विणा बसली ती शांत,
पण गवतांची कुरणे
तहानलेली होती मात्र।
शुभ सकाळ
“आज देवाला सुट्टी आहे
कृपया मंदिरात जाऊ नये,
देव खुप बिझी आहे
त्याला साकडं घालू नये।
जायचंच असेल तर जा एका अनाथाश्रमात,
तो तिथे लहान पोरांना हसवीत आहे,
तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला.
देवाला आज सुट्टी आहे।
तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात,
प्रेमाने रोग्याला बरा करताना
तुम्ही जा आणि हातभार लावा
मात्र आपली तक्रार सांगू नका कारण आज देवालाही सुट्टी आहे।
तो दिसेल वृद्धाश्रमात आजी
आजोबांचे डोळे पुसताना,
रुमाल घेवून जा तुम्हीही अश्रु पुसण्यासाठी
मात्र आपले अश्रु दाखवु नका कारण आज देवाला सुट्टी आहे।
तो बसला आहे ट्रॅफिक सिग्नल वर खेळणी विकणा-या मुलांच्या सुरक्षेसाठी
तुम्ही जा….हातात वह्या पुस्तके देऊन त्यांना सुशिक्षित करा
उगीच पाखंड पुराणासाठी मंदिरातही जा हवंतर
पण आज देवाला सुट्टी आहे।
तो बसला आहे अन्नाच्या कणात,
उगीच अन्न वाया घालू नका,
जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला,
तो आज त्यांच्यात रमला आहे ।
उगीच मंदिरात जाऊन देवाचा वेळ घालवू नका त्याला भरपूर कामं आहेत,
जमलंच तर काही समाजकार्य करा.
आज देवाला सुट्टी आहे…..
बळ दे इतकं, मला परमेश्वरा…
सहन करण्या घाव निरंतर,
ठेऊ कशाला?
हिशोब दुश्मनांचा
उपसतात जेव्हा आपलेच खंजर !
क्षमा कर त्या साऱ्यांना
केले अपराध त्यांनी जरी पुन्हा,
पसरुनी कर दोन्ही, दारी तुझ्या
करतोय मी हि नम्र प्रार्थना !
शुभ सकाळ
आभिमान असे मराठा असल्याचा
गर्व वाटे या लाल मातीचा
स्वाभिमान माझ्यात स्वराज्याचा
जिव ओततो शिवरायां चरणी
रग माझ्यात शंभू राजांची
देव भाव पंढरीचा पांडुरंग
गगनचुंबी स्वप्न आमूचे
मावळे आम्ही शिवशाहीचे. ..
शुभ सकाळ
शिखरावर जाण्यासाठी वाट शोधावी,
ध्येयासाठी निराशा नसावीच ।
आल्या कितीही अडचणी जरी,
यशासाठी थोडी वाट पहावीच।।
शुभ सकाळ
अपयशाची वाट येते,
रस्ता चुकला असताना।
यशाचा चॊक लागतो,
विचार करुन वाट चालताना ।।
शुभ सकाळ शुभ दिन
आयुष्याची वाट आहेच थोडी निराळी,
केला घात की लागे माती काळी।
वेदनांना जीवनात आहेच नाहि जागा,
अपयशाला हरविण्याच्या कामाला लागा।।
शुभ सकाळ
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप.
त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
शुभ सकाळ
सुंदर पहाट
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले ,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!