Good Morning Pictures and Messages For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram

Clove Benefits in Marathi

लवंग चे आरोग्यवर्धक फायदे

1) लवंग अस्थमाच्या आजारावर फायदेशीर आहे. 30 मि. ली. पाण्यात 6 लवंगा घेऊन ते पाणी उकळून त्याचा काढा तयार करून तो काढा मधासोबत दिवसांतून 3 वेळा घ्यावा त्याने अस्थमाच्या रोग्याला फायदा होतो

2) दाताच्या दुखण्यातसुद्धा लवंग गुणकारी असते, यात असलेले एंटिसेप्टिक गुण दातांमध्ये संक्रमणाला कमी करतात.

3) दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा. तो लेप कपाळावर लावल्याने डोकं दुखी थांबते.

4) डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उगाळून ते पाणी डोळ्यांना लावल्याने जळजळ कमी होऊन डोळ्यांना आराम मिळतो.

View More

Marathi Prayer For Eradication Of Corona Virus
चला मिळून मना पासून देवाला प्रार्थना करूया की विश्वाला Corona Virus च्या या कहर पासून वाचव।

View More

तोंड येणे किंवा तोंडात व्रण उठ

” 1) पेपर मिंट चे तेल (पुदिना तेल) त्या जागी लावावे. त्यामधे थोडी बधिरता देण्याची क्षमता असते.

2) थोडेसे खोबरेल तेल व्रणांना हलक्या हाताने लावावे. किसलेले ओले खोबरे चावुन चावुन खाल्याने फ़रक पडतो.

3) विड्यासाठी वापरला जाणारा सुका कातही जंतुमुक्त ठेबण्यास मदत करतो. “

Tags:

ताप आल्यास घरगुती उपाय

“1) ताप १०४ डिग्री फॅ. च्या वर गेला असेल किंवा
कमी तापात देखील मूल अस्वस्थ असेल तर नळाचे पाणी घेऊन त्याने स्पंजिंग करावे. जर खूप थंड पाणी वापरले तर त्याने थंडी भरुन येईलआणि ताप कमी होण्यास मदत होणार नाही.

2) शरीरातील जास्त उष्णता खेचून घेणे हा स्पंजिंगचा फायदा आहे. मुलाला पंखा सुरु ठेवून थंड ठिकाणी ठेवावे. त्याचे कपडे काढून नळाच्या पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून घ्यावा आणि मुलाच्या शरीराभोवती गुंडाळावा. टॉवेल गरम किंवा उबदार झाला की काढून घ्यावा आणि ताप कमी होईपर्यंत हे सारखे करावे.

3) स्पंजिंग केल्याने सर्दी होते हा एक गैरसमज आहे. काही प्रमाणात तो खरही आहे पण जास्त तापाचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्दी झाली तर ती सहजपणे कमी करता येते.”

Tags:

दातदुखी वर घरगुती उपाय

“1) दुखणारया दाताच्या रेषेत गालावरुन
बर्फाची पुरचुंडी फिरवावी त्यामुळे दुखणं थोडं बधिर होतं. जर दातदुखी जंतू संसर्गाने झाली असेल आणि सूज आली असेल तर हा उपाय विशेष फायदेशीर ठरतो.

2) पण जर किडीमुळे दातदुखी झाली नसेल तर वरील उपाय त्रासदायक ठरु शकतो. अशा वेळी गरम पाण्याची बाटली/पिशवी वापरावी.

3) दातांना कीड असेल तर टूथपिक ने किडलेला भाग स्वच्छ करावा आणि तिथे लवंगाच्या तेलाचा बोळा भरुन ठेवावी.

4) १ चमचा मीठ अर्ध्या लिटर पाण्यात घालून त्या द्रावणाने गुळ्णा करून तोंड स्वच्छ ठेवावे.”

Tags:

Subscribe

Loading