Shravan Shubhechha Sandesh Images In Marathi
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा
शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे, श्रावण मासच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार ! शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो, आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो… ओम नमः शिवाय ! हैप्पी श्रावण
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!
आला आषाढ-श्रावण
– बा.सी.मर्ढेकर
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम,
वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
कोवळ्या उन्हासोबत
आलेली अलगद श्रावणसर
अवखळ वाऱ्याचीअल्लडशी लहर
पानाफुलांना फुटलेला अनोखा बहर
तुषार किरणांनी साकारलेला इंद्रधनु
एका अलवार नात्याची
सप्तरंगी प्रतिमाच जणू
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने प्यावा
वर्षाऋतू तरी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ सकाळ मित्रानो!!!!!
आज बालपणी शाळेत शिकलेली
– ‘बालकवी’ यांची निसर्ग कविता
#श्रावणमासी हर्ष मानसी आठवूया
🌹❤🌹🌹❤🌹❤🌹
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे
वरति बघता इंद धनुचा गोफ दुहेरि विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळिच ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पखं पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शु्द्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत
– #बालकवी
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या
आलाय पाऊस भिजून घ्या
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा
यक्षप्रश्न मनी झाला
का बरे निसर्ग गाऊ लागला
संगती झाडे वेली
अरे खुल्या मना रे
हा बघ श्रावण आला
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुप्रभात मित्रांनो ॐ नमः शिवाय
श्रावण सोमवार च्या खुप खुप शुभेच्छा.
आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत
आणि उत्तरोत्तर आपली भरपूर प्रगती होवो
ही महादेवाच्या चरणी प्रार्थना..
हर हर महादेव
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
हे भॊळ्या शंकरा – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा …. शंकरा
हे भॊळ्या शंकरा ….. महादेवा
हे भॊळ्या शंकरा ….. हे भॊळ्या शंकरा
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा – २
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃
बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃
बेलाच्या पानाची
त्रिशूल डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती …. हॊ – २
त्रिशूल डमरू हाथी,
संगे नाचे पार्वती – २
आवड तुला बेलाची – २ 🌺🍃
बेलाच्या पानाची
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी …. हॊ – २
भॊळेनाथा आलॊ तुझ्या दारी,
कुठे हि दिसे ना पुजारी – २
आवड तुला बेलाची – २
बेलाच्या पानाची 🌺🍃
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पान पानात लपला श्रावण
फुल फुलात उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा