Vasubaras Wishes In Marathi

Vasubaras Diwali Shubhechha In Marathi
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला स्वपुत्रास दे जी
कृषी चालवाया परमपुज्य जी वंद्य या भारताला नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।
वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा

Vasubaras Chi Shubhechha

Vasubaras Marathi Shubhechha

Vasubaras Shubhechha In Marathi
वसुबारसची आपणास आणि आपल्या कुटुंबास
हार्दिक शुभेच्छा

Vasubaras Diwali Shubhechha
वसुबारस !
गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी
आणि भरभराटीची जावो.

Govatsa Dwadashi Chya Aapnas Hardik Shubhechha
गोवत्स द्वादशी च्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

वसुबारस ची संपूर्ण माहिती

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा
केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन)
त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या
हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
Vasubaras Chya Shubhechha
आपला देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. पाहू कसा साजरा केला जातो हा दिवस
असा साजरा करावा हा सण
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.
ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते.
गायीच्या पायावर पाणी टाकावे.
गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
वासराची अश्यारिती पूजा करावी.
निरांजनाने ओवाळून घ्यावे.
गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी.
या दिवसाचे काही नियम
स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.

आपल्याला दूध देऊन आपले पोषण करणार्‍या या प्राण्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून स्त्रिया ही पूजा करतात.


आज वसुबारस
दिवाळीचा
पहिला दिवस,
हि दिवाळी
तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व
भरभराटिची जावो.
वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a comment

Subscribe

Loading